“या” मतदारसंघात भाजप करु शकते ईव्हीएम घोटाळा – हार्दिक पटेल

“या” मतदारसंघात भाजप करु शकते ईव्हीएम घोटाळा – हार्दिक पटेल

अहमदाबाद – मतमोजणीच्या पूर्वसंध्येला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्यावरुन भाजपला टार्गेट केलं आहे. एटीएम हॅक करु शकतात मग ईव्हीएम सुद्धा हॅक होऊ शकतं असा दावा हार्दिक पटेल यांनी केला आहे. भाजपनं मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञांची मदत घेतली असून शनिवारी रात्री आणि रविवारी रात्री ईव्हीएम हॅक करुन भाजप आपल्याला हवे तसे निकाल लावून घेऊ शकते असा गंभीर आरोपही हार्दिक पटेल यांनी केला आहे.

भाजपने गुजरातमधील काही अशा जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे, जिथे काटों की टक्कर आहे. अशाच ठिकाणी भाजप ही गडबड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे फारसा कुणाला संशय येणार नाही अशी खबरदारी भाजप घेत असल्याचाही आरोपही हार्दिक पटेल यांनी केला आहे. ज्या मतदारसंघात विजयाचं मार्जिन हे 1500 ते 2000 आहे अशाच ठिकाणी गडबड होण्याची शक्यता आहे असही हार्दिकचा दावा आहे. ईव्हीएम हॅक करणं शक्य झालं नाही तर भाजप निश्चितच पराभूत होईल असंही हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.

COMMENTS