औरंगाबाद – भाजपमध्ये सध्या सुरु असलेल्या सहज इनकमिंगमुळे पक्षाची मोठी बदनामी होत असल्याचं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. पक्षामध्ये पूर्वी सखोल चौकशी करुनच कार्यकर्त्याला प्रवेश दिला जात होता परंतु आता भाजपमध्ये प्रवेश करणं खूप सोपं झालं असून कोणालाही प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे भाजपची बदनामी होत असल्याचं वक्तव्य हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. ते औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
यापूर्वी भाजपचा कार्यकर्ता घरी आला की आनंद होत होता परंतु आता अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला जात आहे ज्यांच्यामुळे पक्षाची बदनामी वाढत आहे. तसेच भाजपमधील अनेक जुने-जाणते आणि निष्ठावान कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले आहेत. भाजपचा आज महावृक्ष झाला आहे परंतु ज्यांनी खत-पाणी घातले त्यांच्याकडेही लक्ष दिले पाहिजे. २५ वर्षांपूर्वी जसे काम करत होतो तसे काम आताही केले पाहिजे. असंही त्यावेळा बागडे यांनी म्हटलं आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाध्ये त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘अगली बारी अटलबिहारी’ या घोषवाक्याचे अनेक किस्सेही त्यांनी त्यावेळी सांगितले.
COMMENTS