शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष ?

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष ?

औरंगाबाद- शिवसेनेचे कन्नडमधील आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. याबबत हर्षवर्धन जाधव यांनी स्वतः माहिती दिली असल्याची बातमी दिव्य मराठीनं चालवली आहे. यामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी मराठ्यांसह सर्वच समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी करत असल्याचं म्हटलं असून एक सक्षम पर्याय यातून देण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मराठा क्रांती चौकात सुरु असलेल्या सकल मराठा मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास भेट दिल्यानंतर जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

दरम्यान हर्षवर्धन जाधव हे पक्षावर नाराज असल्याची माहिती असून राजीनामा दिल्यानंतर ते सोमवारी मुंबईत गेले होते.त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर काहीही बोलू नका अशी तंबी दिली होती. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी नवीन राजकीय मोर्चाची घोषणा केल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे नवी पक्षाची स्थापना करणार की दुस-या पक्षात जाणार याबाबत जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

COMMENTS