माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचं रावसाहेब दानवेंना ओपन चॅलेंज, आत्महत्याही करण्याची दिली धमकी!

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचं रावसाहेब दानवेंना ओपन चॅलेंज, आत्महत्याही करण्याची दिली धमकी!

औरंगाबाद – माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी रावसाहेब दानवे यांना ओपन चॅलेंज केलं आहे. जालन्यावतून अपक्ष निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवा असं जाधव यांनी म्हटलं आहे.तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही,’ अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली आहे.

तसेच माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. २००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवलं नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो असल्याची टीका जाधव यांनी केली आहे.

तसेच माझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवलं. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचं तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मतं कोणी दिली? असा सवालही जाधव यांनी केला आहे.

तसेच तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू, पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलंत किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाहीत अशी धमकीही हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2990414037745641&id=1552511828202543

COMMENTS