पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दाव्याला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचा टोमणा काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये येवून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढविणार असुन भले आघाडी झाली नाही तरी चालेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना टोमणा लगावला आहे.
दरम्यान आघाडीचा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवारांच्या दाव्याला जास्त महत्व देवू नका, असा संदेश तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. आपण इंदापूरची विधानसभा लढविणार असल्याचंही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ठामपणे म्हटलं आहे.
COMMENTS