लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हरियाणामध्ये मोठा धक्का !

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हरियाणामध्ये मोठा धक्का !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कुरुक्षेत्र मतदारसंघातील भाजपचे खासदार राजकुमार सैनी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच सैनी यांनी स्वतःच्या पक्षाची घोषणा केली असून लोकतंत्र सुरक्षा पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. दरम्यान सैनी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे भाजपला याठिकाणी मोठा धक्का बसला असून हरियाणामध्ये भाजपचा ओबीसीचा चेहरा म्हणून सैनी यांची ओळख होती.

दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पक्षाच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं राजकुमार सैनी यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या राज्यातील सर्व जागा लढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. लोकसभेच्या दहा आणि विधानसभेच्या 90 जागा आपला नवीन पक्ष लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील ही लढाई सत्ता परिवर्तन नसून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी असून राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी आम्ही मोठ्याप्रमाणात प्रयत्न करणार असल्याचं राजकुमार सैनी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS