नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया, राहुल गांधी यांना हायकोर्टाचा झटका !

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया, राहुल गांधी यांना हायकोर्टाचा झटका !

नवी दिल्ली – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. 56 वर्ष जुन्या हेराल्ड हाऊसला रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2 आठवड्यांच्या आत हेराल्ड हाऊस रिकामं करा नाहीतर कारवाई करण्याचा इशारा कोर्टाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयाने राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता.

तसेच केंद्र सरकारने इमारतीची लीज संपल्यानंतर 15 नोव्हेंबरपर्यंत इमारत रिकामी करण्याचा आदेश दिला होता. मात्र ती इमारत खाली करण्यात आली नव्हती. भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच या वर्षाअखेरीस नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही लवकरच जेलममध्ये जातील. त्यामुळे आगामी अखिल भारतीय काँग्रेसची बैठक तिहार जेलमध्ये होणार असल्याची टीका त्यावेळी स्वामी यांनी केली होती.

 

COMMENTS