भाजप आमदार मंदा म्हात्रेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयाकडून नोटीस !

भाजप आमदार मंदा म्हात्रेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयाकडून नोटीस !

नवी मुंबई – भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना उच्चन्यायालायानं नोटीस पाठवली आहे. सातारा आणि नवी मुंबईत दोन्ही ठिकाणी मतदान करा असं आवाहन मंदा म्हात्रे यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात कोपर खैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दोन ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन केल्यानं मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर ठाणे लोकसभा निवडणूक स्थगित करण्याची मागणी अपक्ष उमेदवार हेमंत पाटील यांनी केली आहे. त्यावर आज उच्च न्यायालयात स्थगितीवर होणार सुनावणी होणार आहे.

दरम्यान युतीचे उमेदवार राजन विचारे आणि नरेंद्र पाटील यांच्या संयुक्त प्रचारसभेत म्हात्रे यांनी मतदारांनी दोनदा मतदान करावं,’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीकाही करण्यात आली होती. मतदारांची दिशाभूल करणे आणि तोतयागिरी करणे या आरोपांतर्गत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS