हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसच्या हातातून सत्ता हिसाकवून घेतली आहे.त्यामुळे आता सत्ता स्थापनेकडे भाजपची वाटचाल सुरु असून भाजपच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचलमध्ये झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु रविवारी अखेर जयराम ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले जयराम ठाकूर हे सेरज विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. तसेच ते २००७ ते २००९ या कालावधीत भाजपचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष होते.
COMMENTS