हिमाचल प्रदेशात 68 जागांसाठी येत्या 9 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशातील निवडणुकासाठी भाजपने सर्व जागांवर म्हणजेच 68 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले आहे. तर काँग्रेसने 59 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील 68 जागांसाठी येत्या 9 नोव्हेंबरला मतदान होणार असून 18 डिसेंबर मतमोजणी रोजी होणार आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर हिमाचल प्रदेशातील 59 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या बैठकीत सोनिया गांधीही उपस्थित होत्या.
हिमाचल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे…
नामनिर्देशित करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर
नामांकन छाननी – 24 ऑक्टोबर
नामनिर्देशन मागे घेण्यासाठी अंतिम तारीख – 26 ऑक्टोबर
मतदान – 9 नोव्हेंबर
निकाल – 18 डिसेंबर
एकूण जागा – 68
COMMENTS