हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी मातोश्रीवर जोरदार राडा !

हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी मातोश्रीवर जोरदार राडा !

मुंबई – मातोश्रीवर हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी आज  जोरदार राडा झाला असल्याचं पहावयास मिळाले आहे.हिंगोला लोकसभा मतदारसंघासाठी जयप्रकाश मुंदडा यांच्या नावाला स्थानिक पदाधिका-यांनी जोरदार विरोध केला आहे. जयप्रकाश मुंदडा हे वसमत विधानसभेचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास हिंगोलीच्या स्थानिक पदाधिका-यांनी विरोध केला आहे.

दरम्यान आज मातोश्रीवर हिंगोलीच्या पदाधिका-यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासमोर जयप्रकाश मुंदडा यांच्या नावाला या पदाधिका-यांनी विरोध केला आहे. या मतदारसंघात जयप्रकाश मुंदडा आणि हेमंत पाटील या दोघांमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी लढत सुरु आहे.त्यामुळे याबाबत आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS