नवी दिल्ली – हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी आता 18 टक्क्यावरुन 5 टक्के करण्याचा निर्णय काल झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल ही घोषणा केली.
ज्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची वार्षिक उलाढाल आजपर्यंत 1 कोटीपर्यंत होती, त्या हॉटेल आणि रेस्टॉरन्टना कम्पोझिशन स्कीमअंतर्गत 5 टक्के, विना एसी रेस्टॉरंटला 12 टक्के आणि एसी रेस्टॉरंट आणि बारमध्ये 18 टक्के जीएसटी भरावा लागत होता. ग्राहकांकडून हा जीएसटी वसूल केला जायचा. कम्पोझिशन स्कीममध्ये ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळत नव्हता. पण अरुण जेटलींनी यावर सांगितले की, रेस्टॉरन्ट चालक ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा देत नसल्यामुळेच जीएसटी दरात कपात करुन, इनपुट टॅक्स क्रेडिट हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, सरकारने काही वस्तूंना 28 टक्क्याच्या स्लॅबमधून वगळले आहे. आता केवळ 50 वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी कर लागणार आहे. सरकारने जीएसटीमध्ये तब्बल 10 टक्क्यांनी कपात केली आहे. सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता आणि व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. 50 वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी लागणार आहे. सरकारने 174 वस्तूंवरील 28 टक्के जीएसटी घटवून 18 टक्के केलाय.
COMMENTS