कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान पद मिळवयचा आहे. अनेक वर्षापासून ते तसे प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यातमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. पवारांच्या पुढाकारने सध्या राज्यात महाविकास आघाडी विकसित होऊन उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. पण आता पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.
‘जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात गैर काय? मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय पण सध्या संधी दिसत नाही,’ अशी मिश्किल टिप्पणी केली.
इस्लामपूर येथील एका स्थानिक चॅनेलला मुलाखत देत असताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राजकारणात अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मात्र, आमच्या पक्षाकडं सध्या संख्याबळ नाही. शिवाय, त्याबाबतचा अंतिम निर्णय हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतात,’ असं मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात टीका-टिप्पणी सुरू झाली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी टोलेबाजी सुरू केली होती.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांना यांनाही याबाबत विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यामध्ये गैर काय ? प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असते. आता मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… पण सध्या संधी दिसत नाही असा टोलाही त्यांनी मारला.
COMMENTS