राज्याच्या प्रशासकीय सेवेतील 11 अधिका-यांच्या बदल्या !

राज्याच्या प्रशासकीय सेवेतील 11 अधिका-यांच्या बदल्या !

मुंबई –  प्रशासकीय सेवेतील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ. कविता गुप्ता यांची सीकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या डॉ. संजय मुखर्जी हे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. मुखर्जी यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं असून एस एस देशमुख यांच्या निवृत्तीनंतर ते या पदाची सूत्रं स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

 कोणाची बदली कोठे ?

ई रवेंद्रन – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती

एम जे प्रदीप चंद्रन – सामान्य प्रशासन विभाग उपसचिव (माहिती-तंत्रज्ञान)

डॉ. बी. एन. पाटील – पर्यावरण विभागाच्या संचालकपदी

ए. बी धुलज – कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्तपदी

अनुप कुमार यादव – आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक

परिमल सिंह – राज्याचे विशेष विक्री कर आयुक्त

डॉ. एच यशोदः महिला आणि बालविकास आयुक्तपदी

COMMENTS