वाराणसीच्या हिंदु विद्यापीठाच्या सहाय्याने एक नवीन कोर्स सुरू होतोय. आदर्श सून घडवण्याचा कोर्स. तीन महिन्यांच्या या कोर्समध्ये तरुणींनी त्यांच्या पुढील आयुष्यात आदर्श सून बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाणार आहे. पालकांच्या आग्रहावरुन हा कोर्स सुरू करणार असल्याचा दावा केला जातोय. आत्मविश्वास वाढवणे, कौशल्य विकास, घरगुती समस्या कशा सोडवाव्यात, नोकरी आणि घर यामध्ये कसा समतोल साधावा या सारख्या बाबींच प्रशिक्षण यामध्ये दिलं जाणार आहे. मात्र या कोर्सवरुन आता वाद निर्माण होई लागलाय.
काही महिला संघटना आणि राजकीय मंडळींनी केवळ आदर्श सूनच का ? आदर्श नवरा, आदर्श सासरा याचा कोर्स का नको ? असा प्रश्न उपस्थित करत केवळ महिलांनीच आदर्श बनावे का ? पती आणि सास-यांची जबाबदारी काही नाही क ? हा पुरुष प्रधान संस्कृतीचा परिणाम असल्याचीही टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यावर जोरदार टीका केली आहे.
COMMENTS