पाकिस्तान – तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमूख इम्रान खान यांनी आज नॅशनल असेम्बलीत बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे इम्रान खान हे पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहेत. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानसह इतर देशातील काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान पाकिस्तानमधील निवडणुकीत पीटीआय पक्षाने ११६ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी संख्याबळ कमी होते. मात्र, पीटीआय पक्षाने छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीच्या आधारावर सरकार स्थापनेचा दावा केला. यावर आज पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत मतदान झाले. यात खान यांना १७६ मते मिळाली तर विरोधी पीएमएल-एन पक्षाचे शाहबाज शरीफ यांना ९६ मते मिळाली. नवनियुक्त सभापती असद कैसर यांनी या निकालाची घोषणा केली.
COMMENTS