पाकिस्तान निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाची बाजी, “भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार”

पाकिस्तान निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाची बाजी, “भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार”

इस्लामाबाद  पाकिस्तान निवडणुकीत माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षानं सर्वाधिक म्हणजेच118 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे इम्रान खानच्या राजकीय पक्षाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होणार असल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तान निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार असल्याचं म्हटलं आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा दोन्ही देशांमध्ये जास्तीत व्यापारी संबंधांवर भर देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं यावेळी इम्रान खाननं म्हटलं आहे.

दरम्यान इम्रान खान यांनी त्यांच्या पक्षाचा अजेंडा मांडला असून निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पाळणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. १९९६ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली. आता आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. जिनांच्या स्वप्नातील पाकिस्तान प्रत्यक्षात आणायचा असल्याचं माझं स्वप्नं असल्याचंही यावेळी इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS