नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा उघड झाला असल्याची प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. इम्रान खान हे दाखवतात एक आणि करतात दुसरेच, अशा शब्दात भारताने पाक पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे. काश्मीरमधील भारतीय सैनिकांच्या हत्यांनंतर न्यूयॉर्क येथे होणारी भारत-पाक परराष्ट्र मंत्र्यांची नियोजित बैठक रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकशी चर्चा करणे निरर्थक असून पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा उघड झाला असल्याचं भारताने म्हटलं आहे.
Hours after security personnel in Jammu and Kashmir were kidnapped and brutally killed, India called off the planned meeting between External Affairs Minister Sushma Swaraj and Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi in New York
Read @ANI Story | https://t.co/niyxEyD9xN pic.twitter.com/EBEGJdbJ53
— ANI Digital (@ani_digital) September 21, 2018
दरम्यान नियोजित बैठक रद्द झाल्याचा निर्णय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार घेतला आहे. ‘पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांदरम्यानच्या पत्रव्यवहाराचा सन्मान राखत ही बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत दहशतवादावर चर्चा होईल असेही पाक पंतप्रधानांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या चर्चेमागे ‘नापाक’ इरादे असल्याचे सिद्ध झालं असल्याचं रवीश कुमार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS