म्हणून आम्ही पत्र तयार केलं आणि वंचित पासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला – इम्तियाज जलील

म्हणून आम्ही पत्र तयार केलं आणि वंचित पासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला – इम्तियाज जलील

मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक अखेर स्वतंत्र लढण्याचा निर्णय एमआयएमनं घेतला आहे. याबाबतची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. एमआयएमकडून इच्छुक उमेदवारांसाठी उद्यापासून मुलाखती सुरू करणार असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. एमआयएम आणि वंचितची आघाडी झाली होती तेव्हा लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला, आमची अपेक्षा होती की ही अघाडी विधानसभेतही असायला हवी, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता संपली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर आहे आम्ही त्यांना देशाचा नेता म्हणून पाहत होतो. ही आम्हाला सुवर्ण संधी होती.

जुलैमध्ये अधिवेशन सुरू असताना दिल्लीला ओवेसी आणि आंबेडकर बैठक झाली होती त्यावेळी बाळासाहेब बोलले होते की यादी लवकर पाठवा, आम्ही त्यानुसार राज्याची यादी बनवली आणि पाठवली त्या 98 जागांची मागणी होती, त्यानंतर आम्ही मागणी 74 जागांची केली. त्यांचं उत्तर ही आलं नाही. नंतर प्रतिसाद आला नाही, त्यांच्या संसदीय कमिटीकडूनही प्रतिसाद आला नाही. नंतर त्यांनी पुन्हा 2 दिवस मागितले, उत्तर आलं नाही त्यानंतर काही दिवसांनी ई-मेल आला, 74 जागा देऊ शकत नाही कमी करून सांगा
नंतर थेट ई-मेल केला आणि 8 जागा देऊ शकतो असे कळवले. वंचितला असं वाटत असेल की एमआयएमला वोट बँक नाही, मुस्लिम त्यांचं ऐकत नाही तर आम्ही काय करणार.

नंतर पुन्हा पुण्यात बैठक ठरली, आंबेडकर यांनी माझ्यासोबत न बोलण्याची भूमिका घेतली का, माहीत नाही मी पुण्याचा बैठकीत बाहेर थांबलो, त्यावेळी बाळासाहेब म्हणाले 2 दिवसात निर्णय देतो, निर्णय काही आला नाही. शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे, मी ओवेसी यांना पुन्हा बोललो, प्रयत्न केला मात्र ते 8 जागांवर ठाम होते, अखेर आमचाही वेगळा पक्ष आहे आमचंही अस्तित्व आहे, म्हणून आम्ही पत्र तयार केलं आणि वंचित पासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं जलील यांनी म्हटलं आरे.

आता वंचित म्हणत असेल की इम्तियाज सोबत बोलणार नाही तर काय बोलू , काय करणार, आता ते आरोप करताय इम्तियाज आणि ओवेसी यांचं पटत नाही असले घाणेरडे आरोप करतात, तर लक्षात ठेवा तुम्हाला बोलता येत तर मला तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं. तुम्ही म्हणताय बोलणी सुरू आहे, सगळे अधिकार मला आहे कुणासोबत बोलताय ते तरी सांगा. ओवेसी म्हणाले मला कुणीही फोन केला नाही, माझी कुणासोबतही चर्चा सुरू नाहीये, ( म्हणजे आंबेडकर खोटं बोलले असं न बोलता इम्तियाज बोलून गेले ) आणि आम्ही उद्यापासून आमच्या मुलाखती सुरू करून आमचे उमेदवार उद्यपासून जाहीर कारू. आम्ही कदापी 8 जागा स्वीकारणार नाही अशी भूमिकाही जलील यांनी घेतली आहे.

याचा अर्थ तुम्ही मला खलनायक करताय हे चूक आहे, रस्ता असेल तर अजूनही आम्ही तयार आहोत. इम्तियाज जलीलला यात खलनायक करण्यात येतंय ते वाईट आहे, आंबेडकरांसोबत जाणं ही माझीच कल्पना होती , मी ओवेसी साहेबांना गळ घातली होती, हे चांगल्या रीतीने झालं असतं वंचितने त्यांच्या प्रवक्त्यांना आवरायला हवे. बाळासाहेबांनी आता ही मोठं मन दाखवावे आणि ओवेसी साहेबांसोबत बोलावे, उगाच दिवस वाया घालवू नये असंही जलील यांनी म्हटलं आरे.

दरम्यान आम्हाला तर असा प्रश्न पडतो की आरएसएसच्या लोकांनी आंबेडकरांच्या कानात काही सांगितलं का, बाळासाहेबांना पुन्हा काँग्रेसकडे जायचं असेल तर कशाला ही वंचित आघाडी असा आम्हाला प्रश्न पडतो. किमान 50 जागा दिल्या तरच आम्ही वंचित सोबत जाण्याचा विचार करू शकतो असंही जलील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS