लोकसभेत गदारोळ, पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा !

लोकसभेत गदारोळ, पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा !

नवी दिल्ली – कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्ताननं दिलेल्या वागणुकीचे पडसाद बुधवारी लोकसभेत उमटले असल्याचं पहावयास मिळालं आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचं कामकाज सुरु होताच पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. प्रश्नोत्तराच्या तासात पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी सावंतच्या घोषणांना पाठिंबा दिला. त्यावेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांना शांत राहण्याचं आवाहन केलं परंतु खासदारांचा वाढता गोंधळ पाहताय काहीवेळ कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी गेली होती. परंतु या भेटीदरम्यान पाकिस्ताननं आपली लायकी दाखवून दिल्याचं पहावयास मिलालं. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची कपाळावरील सौभाग्याचं लेनं असलेली टिकलीही काढायला लावली. एवढच नाही तर हवाला देत कपडे बदलायला लावले.

तसेच भेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. पाकिस्तानच्या या कृतीचा भारतातून तीव्र निषेध केला जात आहे. याचेच पडसाद बुधवारी लोकसभेत उमटले असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS