आज देशभरात 72 वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील ठिकठिकाणी राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनानं ध्वजारोहण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन देशातील नागरिकांना संबोधित केले. तर प्रत्येक राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शासकीय निवास्थानी आणि मंत्रालयासमोर ध्वजारोहण केले. यापैकी काही क्षणचित्रे खालीलप्रमाणे…..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अमर जवान ज्योती याठिकाणी ध्वजारोहण करुन अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले.
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी केले ध्वजारोहण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले.
अमित शाह यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयासमोर ध्वजारोहण केले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या मुंबईतील मुख्यालयासमोर ध्वजारोहण केले.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ध्वजारोहण केले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहून अभिवादन केले
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडीएम येथे ध्वजारोहण केले.
मा. रविंद्र वायकर पालकमंत्री-रत्नागिरी जिल्हा यांच्या हस्ते आज दिनांक १५.८.२०१८ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले.
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे ध्वजारोहण केले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी ध्वजारोहण केले.
COMMENTS