कर्नाटकात कोणाला किती जागा मिळणार, इंडिया टुडेचा ओपिनियन पोल !

कर्नाटकात कोणाला किती जागा मिळणार, इंडिया टुडेचा ओपिनियन पोल !

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. काँग्रेसकडून सत्ता हिसकाऊन घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी दंड थोपटले आहेत. पंतप्रधान मोदींसह भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी या निवडणुकीसाठी विशेष लक्ष केंद्रीत केलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.तसेच या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी सर्वस्व पणाला लावलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून याबाबत इंडिया टुडेनं आपला ओपिनियन पोल जाहीर केला आहे. यामध्ये काँग्रेसला 90 ते 101, भाजपला, 78 ते 86 आणि जेडीएसला 34 ते 43 जागा मिळणार असल्याचं इंडिया टुडेच्या ओपिनियन पोलमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान इंडिया टुडेनं जाहीर केलेल्या या ओपिनियन पोलमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसलाच जास्त जागा मिळतील असं दिसून येत आहे परंतु कोणालाच बहूमत मिळणार नसल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. या सर्वेमध्ये मतदारांचं मत जाणून घेतलं असता मंदिर दर्शनामुळे राहुल गांधी यांनी फायदा होणार असल्याचं 42 टक्के नागरिकांनी म्हटलं आहे. तर 35 टक्के नागरिकांनी याचा फायदा काँग्रेसला होणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच 23 टक्के नागरिकांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

2013 मध्ये कोणाला किती जागा होत्या

काँग्रेस-121

भाजप-40

जेडीएस-40

केजेपी-06

इतर-16

दरम्यान २२४ जागांच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात म्हणजेच १२ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहेत. तर १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इंडिया टुडेचा ओपिनियन पोल कितपत खरा ठरणार आहे ते 15 मे रोजीच समजणार आहे.

COMMENTS