नवी दिल्ली – देशातील टॉप 3 मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नसल्याचं एका राष्ट्रीय सर्व्हेमधून समोर आलं आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सगळ्यात लोकप्रिय असल्याचं या सर्व्हेमध्ये म्हटलं आहे. पॉलिटिकल ऍडवायजर ग्रुप I-PAC ने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन हा सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच या सर्व्हेमध्ये भाजपसाठी मात्र आगामी निवडणुकीत धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान या सर्व्हेमध्ये दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आगामी काळातही पंतप्रधान म्हणून पसंती देण्यात आली आहे. तसेच मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचं नाव समोर आहे. I-PAC ने 57 लाख लोकांमध्ये हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार देशातील पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव नाही. यामध्ये एक नंबरवर दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दुस-या स्थानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आणि तिस-या स्थानावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं नाव आहे. तर चौथ्या नंबरवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव आहे.
तसेच या सर्व्हेमध्ये अभिनेते आमिर खान, योग गुरु बाबा रामदेव, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, क्रिकेटर एमएस धोनी, क्रिकेटर एमएस धोनी, सौरव गांगुली, माजी रिजर्व बँकचे गवर्नर रघुराम राजन, अभिनेता अक्षय कुमार आणि उद्योजक रतन टाटा यांनी राजकारणात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हा सर्व्हे 18 वर्षांवरील नागरिकांचा करण्यात आला असून यामध्ये 7 हजार 536 विद्यार्थांचं मत घेण्यात आलं आहे.
COMMENTS