इस्त्राईलच्या पंतप्रधानांकडून मोदींना खास गिफ्ट, आपत्कालीन परिस्थितीत होणार फायदा !

इस्त्राईलच्या पंतप्रधानांकडून मोदींना खास गिफ्ट, आपत्कालीन परिस्थितीत होणार फायदा !

नवी दिल्ली –  इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींसाठी खास गिफ्ट मागवलं आहे. बेंजामिन हे मोदींना मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप भेट म्हणून देणार आहेत. ते आजपासून भारत दौर्‍यावर आले आले असून या दो-यादरम्यान ही जीप मोदींना भेट म्हणून देणार आहेत. या जीपचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत मोठ्याप्रमाणात होणार आहे. भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान या जीपचा फायदा होणार आहे.

जीपची वैशिष्ट्य 

समुद्रातील खारे पाणी गोड करते

जीपचे वजन 1540 किलो

90 किलोमीटर प्रतितास बोटीचा स्पीड

जीप कोणत्याही मौसमात चालू शकते

नदी, तलाव, समुद्र, विहीर या ठिकाणी सहज कनेक्ट होते
जीपची किंमत 72 लाख रूपये

 

मागील वर्षी पंतप्रधान मोदी इस्त्राईल दौर्‍यावर असताना त्यांना मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप आवडली होती. इस्त्राईलमध्ये ओल्गा बीचवर नेतन्याहू यांनी मोदींना सोबत घेऊन ड्राईव्हही केली होती. आता हीच मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप मोदींना भेट म्हणून मिळणार आहे.

COMMENTS