पुणे – महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरेंच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आज सकाळी बाणेर परिसरातील वीरभद्र नगरमधील त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. बाबुराव चांदेरे आतापर्यंत तीन वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात चांदेरे यांनी कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाचीचांगलीच चर्चाही रंगली होती. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या पोषाखात येऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. चांदेरे यांच्या घरावर अचानक छापा टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
COMMENTS