मुंबई – ठाकरे कुटुंबातील वाद अखेर मिटला असून उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील याचिका मागे घेतली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका आज अखेर त्यांनी मागे घेतली आहे.
दरम्यान जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या खटल्यात शुक्रवारी जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात अर्ज दिला. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, त्यामुळे याचिका मागे घेत असल्याचे त्यांनी हायकोर्टात सांगितले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे.
COMMENTS