काँग्रेसच्या व्यासपीठावर एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा, “पक्ष सोडायला भाग पाडू नका !”

काँग्रेसच्या व्यासपीठावर एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा, “पक्ष सोडायला भाग पाडू नका !”

जळगाव – नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.  मी पक्ष सोडणार नाही मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नसल्याचं वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर केलं आहे. जळगावातील रावेतमधील कार्यक्रमात ते बोलत होते.

मी गुन्हेगार असेल तर आपल्याला तुरुंगात टाकावं, मी काय भ्रष्टाचार केला, कुठे पैसा कमविला आहे ते तुम्ही जनतेसमोर सांगा. माझ्याबद्दल ऐकायला जनतेला उत्सुकता आहे असंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे. एकनाथ ख़से यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर हे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

COMMENTS