जळगाव – भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप उमेदवार अडचणीत, आघाडाली फायदा ?

जळगाव – भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप उमेदवार अडचणीत, आघाडाली फायदा ?

जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाटील यांच्या वडिलांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्यावर
भाजपचेच नेते असलेल्या कैलास सूर्यवंशी यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच उन्मेश पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असल्याचं दिसत आहे.

दरम्यान जळगाव भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान ही धूसफूस आणखी वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच आता उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्याच नेत्यानं हा गुन्हा दाखल केल्यामुळे याचा फटका उन्मेश पाटील यांना बसणार असल्याचं बोललं जात आहे.

याठिकाणी महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील आणि आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यात काँटे की टक्कर होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु या अंतर्गत धुसफूशीचा फायदा आघाडीला होऊ शकतो असं बोललं जात आहे.

COMMENTS