जळगाव – महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवड निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. महापौरपदी सीमा भोळे तर उपमहापौरपदी भाजपाचे डॉ. अश्विन सोनवणे यांची निवड निश्चित करण्याती आली असून सीमा भोळे या भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी आहेत. तसेच शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौरपदासाठी प्रशांत नाईक यांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. १८ सप्टेंबर रोजी आता विशेष सभा होणार असून त्यात निवड जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान भाजपातर्फे महापौरपदासाठी अनेक उमेदवार इच्छूक होते. अखेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार भोळे यांच्या पत्नीला संधी दिली. भाजपाने सत्ता मिळविल्यापासून महापौरपदी कुणाला संधी मिळते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते. परंतु आज भाजपकडून महापौरपदी सीमा भोळे तर उपमहापौरपदी भाजपाचे डॉ. अश्विन सोनवणे यांची निवड निश्चित करण्याती आली आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.
COMMENTS