जालन्यात रावसाहेब दानवे तर मावळमध्ये श्रीरंग बारणे विजयी ?

जालन्यात रावसाहेब दानवे तर मावळमध्ये श्रीरंग बारणे विजयी ?

मुंबई – जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुन्हा एकदा विजय निश्चित असल्याचं दिसत आहे. याठिकाणी लाखो मतांनी रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत. त्यामुळे निकालाचा कल पाहून रावसाहेब दानवे यांनी जालन्यात गुलाल उधळला आहे. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातल्या वादामुळे जालना लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. इथे दानवे विरुद्ध काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात लढत पहायला मिळाली. रावसाहेब दानवे हे जालन्यातून चार वेळा संसदेत निवडून आले आहेत.

दरम्यान मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. याठिकाणी श्रीरंग बारणे हे जवळपास एक लाख मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे बारणे यांचा विजय याठिकाणी निश्चित मानला जात आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून पवार घराण्यातील तिस-या पिढीचा हा पराभव असल्याचं बोललं जात आहे.

या निवडणुकीत मोदींची त्सुनामी – मुख्यमंत्री

दरम्यान राज्यातील या निकालादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली असून यामध्ये फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मागच्या वेळी मोदींची लाट होती तर या निवडणुकीत त्यांची त्सुनामी पहायला मिळाली असल्याचं मुख्यमंत्री म्हटले आहे.

जनतेचा कौल मान्य – शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेतली असून आपला पराभव मान्य करत असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील कार्यकर्ते आणि जनतेचे आभारही यावेळी पवार यांनी मानले आहेत.

COMMENTS