जालना लोकसभा मतदारसंघातील दोघांच्या भांडणात  राष्ट्रवादीला लाभ ?

जालना लोकसभा मतदारसंघातील दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीला लाभ ?

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती झाली आहे. परंतु काही मतदारसंघावरुन दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद सुरु आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामधील संघर्ष विकोपाला गेला आहे. अशातच आघाडीकडून या मतदारसंघावर राष्ट्रवादीनं दावा केला असून याठिकाणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दानवे – खोतकर यांच्या भांडणात चव्हाण यांना फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान २० वर्षांपासून जालना मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव होत असून हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादीतून भाजपा आणि आता भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या माजी आमदार अरविंद चव्हाण यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच जालना मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यासाठी चव्हाणही इच्छूक असुन ते कामाला लागले आहेत. त्यामुळे चव्हाण यांना संधी मिळाली तर दानवे-खोतकर यांच्या भांडणात राष्ट्रवादीला
फायदा मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS