जालन्यातील शिक्षकाचा  आकाशवाणी आमदार निवास येथून आत्महत्या करण्याचा प्रयत्न ! पाहा थरारक व्हिडीओ

जालन्यातील शिक्षकाचा आकाशवाणी आमदार निवास येथून आत्महत्या करण्याचा प्रयत्न ! पाहा थरारक व्हिडीओ

मुंबई – आमदार निवासावर चढून एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. वेतन मिळत नसल्याने आमदार निवासावर चढून या शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. या घटनेनंतर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्या शिक्षकाला समजवण्याचा प्रयत्न केला.

आमदार निवासावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणारे हे शिक्षक जालना जिल्ह्यातील आहेत. खैरे असे या शिक्षकाचे आडनाव आहे. जवळपास एक तास पोलीस आणि अमरावती विभाग स्थानिक शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी त्या शिक्षकाची समजूत काढली. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक पगार मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

आपल्याला लेखी स्वरुपात सर्व पाहिजे आणि त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी पाहिजे, अशी मागणी शिक्षकाने केली. नाना पटोले आणि उदय सामंत यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नाना पटोले यांनी खैरे यांच्याशी स्पीकरच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS