बीड – ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा भ्रष्टाचार शासकीय अधिका-यांनीच केला असल्याची माहिती असून याबाबत परळी तालुक्यातील 24 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान जवळपास 2 कोटी 41 लाखांचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे. तालुक्यातील सर्व कामे कागदोपत्री दाखवून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी रडारवर आहेत. तसेच हा भ्रष्टाचार फक्त परळीतच नसून पूर्ण जिल्ह्यात झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
COMMENTS