नागपूर – भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दकी यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची कार अज्ञातांनी जाळली आहे. रात्री एक ते दीडच्या दरम्यान दत्तात्रय नगर परिसरात त्यांच्या घरासमोर उभी असलेली पालीयो कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवण्यात आली आहे. यामध्ये त्यांची कार जळून खाक झाली आहे. सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून कार पेटवल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत.
दरम्यान मी भाजपचं काम करतो म्हणून काही कट्टरपंथी मुस्लिमानांना हे आवडत नाही. हे काँग्रेसशी संबंधित कट्टरवादी हल्लेखोर असावेत असा संशय जमाल सिद्दकी यांनी व्यक्त केला आहे. माझ्यावर गेल्या काही दिवसात हा दुसरा हल्ला असून मला फोनवर जीवे मारण्याची धमकी ही दिली गेली होती. प्रत्येक वेळा पोलिसांकडे तक्रार केली मात्र नागपूर पोलीस माझ्या तक्रारीबद्दल संवेदनशील नाही असा आरोप जमाल सिद्दकी यांनी केला आहे.
COMMENTS