जामनेरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा सफाया, 25 पैकी 25 जागा भाजपनं जिंकल्या !

जामनेरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा सफाया, 25 पैकी 25 जागा भाजपनं जिंकल्या !

जळगाव – जामनेर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा सफाया झाला असून या निवडणुकीत भाजपला बहूमत मिळालं आहे. त्यामुळे इतर पक्षांना भाजपनं जोरदार धक्का दिला आहे. याठिकाणी घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच 25 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची माळ साधना महाजन यांच्या गळ्यात पडली असून ८ हजार ४०० मतं महाजन यांना मिळाली आहेत. साधना महाजन या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत.

दरम्यान या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसनं सर्वस्व पणाला लावलं होतं. परंतु भाजपनं जोरदार मुसंडी मारत याठिकाणी बहूमत मिळवलं आहे. 25 जगांवर ही निवडणूक घेण्यात आली होती. या 25 ही जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. त्यामुळे निश्चितच नगराध्यक्षपदाची माळ गिरीष महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या गळ्यात पडली आहे.

COMMENTS