जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्याची शिफारस, विरोधकांची सरकारवर टीका!

जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्याची शिफारस, विरोधकांची सरकारवर टीका!

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत मांडली. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत सरकारवर टीका केली. भाजपाने आज राज्यघटनेची हत्या केली असून आमचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. राज्यघटनेची सुरक्षा करण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू पण आज भाजपाने राज्यघटनेची हत्या केली असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा होता. परंतु सरकारच्या प्रस्तावानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल. तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्यसभेत मांडला. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती असं यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.

COMMENTS