मुंबई – काही दिवसातच धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार असल्याचे संकेत पशुसंवर्धन मंत्री आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. सरकार दरबारी आता धनगर आरक्षणासाठी वेगानं काम सुरू झालं आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. आरक्षणासाठी मुख्यमंत्री धनगर आमदारांसह दिल्लीला जाणार आहेत. मंत्री नव्हतो तेव्हा माहिती नव्हतं पण आरक्षणासंदर्भातील तांत्रिक बाजू कळत असल्याची कबुलीही जानकर यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान धनगर आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सकारात्मक अहवाल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर आरक्षण देणार असल्याचंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे धनगर आरक्षणासाठी आता सरकार दरबारी वेगानं काम सुरू झालं असल्याचं दिसत आहे.
COMMENTS