आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक आघाडी, जानकर, शेट्टींची गुप्त बैठक !

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक आघाडी, जानकर, शेट्टींची गुप्त बैठक !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक आघाडी स्थापन होणार असल्याचं दिसत आहे. कारण राज्यात वेगळी आघाडी स्थापन करण्यासाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुढाकार घेतला असल्याचं  आहे. जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत जानकर यांनी राजू शेट्टी यांच्यासमोर वेगळी आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती आहे.

दरम्यान जानकर, राजू शेट्टी, रामदास आठवले, विनायक मेटे एकत्र येऊन वेगळी आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना – भाजपा युतीमध्ये स्थान दिलं नसल्यामुळे जानकर, आठवले, मेटे नाराज आहेत. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांच्याबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी महादेव जानकर यांच्या हालचाली
सुरु झाल्या असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राजू शेट्टी याबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान या वेगळ्या आघाडीची स्थापना करण्यात आली तर शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS