नागपूर – विधानपरिषदेसाठी भाजपच्या कोट्यातून आज रासपचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महादेव जानकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दावने यांचे पाय धरले असल्याचं पहावयास मिळालं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान महादेव जानकर यांनी भाजपच्या कोट्यातून अर्ज दाखल केला असून त्यांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा हट्ट भाजपकडे धरला होता. त्यानंतर जानकर यांचा हट्ट भाजपनं मान्य केला आहे. त्यामुळे जानकर यांनी आज रासपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपनं पुरवलेल्या या हट्टामुळे जानकर यांनी रावसाहेब दानवे यांचे पाय धरले असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार असून 16 जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख होती.
COMMENTS