गृहमंत्री आणि गटनेते जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थखाते अजित पवारांकडे ?

गृहमंत्री आणि गटनेते जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थखाते अजित पवारांकडे ?

मुंबई – काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपदाचा वाद अखेर मिटला. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. काँग्रेसकडून विदर्भातील साकोलीचे आमदार नाना पटोले याचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी जाहीर केलं. भाजपनंही किसन कथोरे यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवायचं ठरवलं आहे. असं असलं तरी महाराष्ट्र विकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता नाना पटोले यांची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात या पदासाठी चुरस सुरू आहे.

अजित पवार यांनी अचानक भाजपमध्ये जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ते परत आले असले किंवा त्यांना आणलं असलं तरी शरद पवार त्यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळेच अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास थोरले पवार फारसे उत्सुक नसल्याची चर्चा आहे. मात्र पक्षातील आमदारांचा अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद द्यावं असा दबाव असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देणं पक्षाला परवडणारं नाही अशीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देऊन अर्थखात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अजित पवारांनी पक्षाविरोधात केलेल्या बंडानंतर त्यांच्याकडी गटनेतेपदाची जबाबदारी ही जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्याकडे ती जबाबदारी कायम ठेवत गृहमंत्रालयाची जबादारी त्यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र विकास आघाडीत ठरल्याप्रमाणे नगरविकास खाते शिवसेना, गृहखाते राष्ट्रवादी तर महसूल खाते हे  काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS