राज्य गहाण ठेवण्याची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही – जयंत पाटील

राज्य गहाण ठेवण्याची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही – जयंत पाटील

मुंबई – इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीका केली जात असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १० स्मारके बांधण्याची राज्याची क्षमता असताना राज्य गहाण टाकू म्हणणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. यावरून त्यांची राज्याविषयी असलेली आस्था दिसून येते. हे राज्य एक सक्षम राज्य आहे. स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची गरज नव्हे तर इच्छाशक्तीची गरज असल्याचं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची शंभर फुटांनी कमी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळले असून बाबासाहेब आभाळाएवढे उंच आहेत, कोणताही पुतळा त्यांची उंची मोजू शकत नाही. तसेच सर्वांच्या सहमतीने स्मारकाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये तसूभरही बदल होणार नसल्याचं ते म्हणाले. तसेच बाबासाहेबांचे स्मारक हे होणारच वेळ पडली तर  राज्य गहाण ठेवू असं त्यांनी म्हटलं होतं. यावर जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

 

 

COMMENTS