नागपूर – लोकपाल नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव यांसारख्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उपोषण केले. उपोषणाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या पाया पडून निवडणुकांपर्यंत वेळ काढून घेतली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाआघाडीत सामिल होण्याबाबतही त्यांनी खुलासा केला. प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काहीही बोलेले तरी ते आमच्यासाठी महत्वाचे नाही. भाजप-शिवसेनेला आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आंबेडकरी मते एकत्र यावी, असा आमचा प्रयत्न असून प्रकाश आंबेडकरांसोबत महाआघाडीबाबत चर्चा सुरु आहे. काही मुद्द्यांवर एकमत झालं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS