सोलापूर – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप सोपल यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आयुष्यभर एकाबाजूल रहायचं आणि स्वतःच्या तिन्ही सांजच्या वेळी बुद्धी भरकटल्यानंतर असं वागायचं. तुमची संध्याकाळ झाली असेल पण तारुण्य, मध्यम वय तुम्ही ज्या नेत्याच्या सानिध्यात घालवलं तो नेता अजूनही त्याच्या तिन्ही सांजेत तरुण आहे. आणि त्या तरुण नेत्याबरोबर राहण्याचं धाडस तुम्हाला नाही.
महाराष्ट्रात असे अनेक आमदार येऊन गेले, मंत्री झाले, खासदार झाले नावं लक्षात राहतात का पण शरद पवार हे नाव आणखी 50-100 वर्ष महाराष्ट्राच्या लक्षात राहिल. तुम्ही लव्हाळ्यासारखे वागलात इकडं सत्ता जायला लागल्यावर तिकडं गेला, तिकडं सत्ता गेल्यावर इकडं जायला लागला. म्हणजे तुम्ही सगळे आमच्याबरोबर होता, ते सत्ता आमच्याकडे होती म्हणून होता. असा त्याचा अर्थ काढला जातो अशी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच ज्यांच्या हातातून आज तुम्ही शिवबंधन बांधून घेतलं त्या उद्धव ठाकरेंना कळणार नाही का हा माणूस कशासाठी आपल्याकडे आलाय. कसा विश्ववास ठेवणार ही माणसं, तुम्ही हयात एकाबाजूला घातली आणि तिन्हीसांजले पाणी भरायला उद्धव ठाकरेंकडे गेला असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS