मुंबई – राज्यातील विधान परिषद पदवीधर निवडणूक लवकरच होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. याबाबत आज बैठक झाली असून या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तीन पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघातील निवडणूक होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यातील शेतकय्रांना सरकार नक्कीच मदत करणार आहे. निधी उभारणी आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आहे.
आम्ही खासदार किंवा आमदार यांना आता घेण्यास सुचवत नाही. त्यांना वेळ आल्यावर घेऊ असंही पाटील यांनी म्हटलं आहे.तसेच एकनाथ खडसे यांच्याबरोबर त्यांचे समर्थक प्रातिनिधीक स्वरूपात प्रवेश करणार आहेत.एकदा प्रवेश केल्यावर पक्ष संघटना वाढवण्याबाबत विचार होईल. त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणी करू नये असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. तसेच खडसे यांच्यासाठी कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेणार नाहीत. अशा अफवा पसरवू नका,या चर्चना पूर्णविराम दिला तर बरं होईल असंही ते म्हणालेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बरी नाही.ते थोडं आजारी आहेत. त्यांना सर्दीचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS