जनतेच्या एक्झिट पोलनुसार आघाडीला ‘एवढ्या’ जागा मिळतील – जयंत पाटील

जनतेच्या एक्झिट पोलनुसार आघाडीला ‘एवढ्या’ जागा मिळतील – जयंत पाटील

सांगली – लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार? याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहेत. परंतु त्यापूर्वी विविध संस्था आणि न्यूज चॅनल्सनी एक्झीट पोल जाहीर केले आहेत. अनेक संस्थांच्या एक्झीट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. तसेच राज्यातही आघाडीला कमी जागा मिळतील असं एक्झीट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे.

टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला ३७ जागा मिळण्याची शक्यता असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीच्या ५ जागा वाढून ११ जागांपर्यंत आघाडी मजल मारणार असून भाजप-शिवसेनेला ५ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान एक्झिट पोल म्हणजे निवडणूक निकाल नव्हे. आम्ही ग्राऊंडवर गेलो होतो, जनतेच्या मनात काय आहे हे आम्ही अनुभवलं असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात 23 पेक्षा आमच्या जगा कमी येणार नाहीत असं म्हटलं आहे. पण तसं झालं तर दाल मे कूछ काला है असं लोक म्हणतील असही जयं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच प्रत्येक मशीनमधून व्ही व्ही पॅ डच्या स्लिप मोजाव्यात , मोदी लाट ओसरली आहे, त्यांच्या सभा ओस पडत होत्या, जनतेत भाजपा विरोधी रोष होता, तरी एक्झिट पोलप्रमाणे आकडे येणार असतील तर हे मॅनेज आहे असं लोकांना नक्की वाटेल असही जयंत पाटील म्हणाले आहेत.

COMMENTS