मुंबई – राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज फक्त ७ दिवस चालणार आहे. त्यामुळे या विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
येणारे हिवाळी अधिवेशन केवळ ७ दिवसांचे असणार आहे, राज्यात प्रचंड महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी किमान 3 आठवड्यांचे तरी अधिवेशन असावे अशी आमची मागणी होती, मात्र अत्यंत कमी दिवसांचे अधिवेशन ठेवून राज्यसमोरील महत्वाच्या प्रश्नांची चर्चा टाळण्याचा सरकारचा डाव दिसतो.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 1, 2018
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. येणारे हिवाळी अधिवेशन केवळ ७ दिवसांचे असणार आहे, राज्यात प्रचंड महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी किमान 3 आठवड्यांचे तरी अधिवेशन असावे अशी आमची मागणी होती, मात्र अत्यंत कमी दिवसांचे अधिवेशन ठेवून राज्यासमोरील महत्वाच्या प्रश्नांची चर्चा टाळण्याचा सरकारचा डाव दिसत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS