फडणवीसांची जलयुक्त ही फसवी योजना- जयंत पाटील

फडणवीसांची जलयुक्त ही फसवी योजना- जयंत पाटील

सांगली: निवडणुकीच्या काळात जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात जादा ७० टीएमसी पाणी साठल्याची फसवी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण तसे काही झालेच नाही. दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा झाला नाही. उलट निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गेले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई होणारच,’ असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले. ते सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात ७० टीएमसी जादा पाणी साठल्याची फसवी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ७० टीएमसी पाणी म्हणजे वारणा धरणाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी. ७० टीएमसी जादा पाणी साठवता आले असते तर, दुष्काळी भागाला त्याचा फायदा झाला असता. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झालेले नाही. उलट निकृष्ट कामांमुळे जलसाठ्यांमधील गळतीचे प्रमाण वाढले. यामुळे पाणी वाहून गेले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.’

 

COMMENTS