फाशीची शिक्षा झालेल्या 8  दोषींचा मोदींच्या मंत्र्याकडून सत्कार !

फाशीची शिक्षा झालेल्या 8  दोषींचा मोदींच्या मंत्र्याकडून सत्कार !

धुळे जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत नुकताच 5 जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात सध्या जमावाकडून अशाच प्रकारची मारहाण झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. केंद्र सरकारनं नुकतचं अशा प्रकारच्या जमावाकडून मारहाण होणा-या घटना रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं जात असताना खुद्द भाजपच्या केंद्रीय मंत्रानं जमावानं मारहाण केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या 8 जणांचा चक्क सत्कार केला. भाजपचे केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी हा सत्कार केला. त्यावरुन सिन्हा यांच्यावर चहुबाजून टीका होत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

झाऱखंडमधील रामगडमध्ये गेल्या वर्षी 29 जुनला अलीमुद्दीन अन्सारी या 40 वर्षीय  व्यक्तीची जमावानं मारुन हत्या केली होती. गोमांस विकल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरु होती. खालच्या कोर्टानं एकूण 12 आरोपींपैकी 11 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावरील सुनावणी झाली नाही. फाशी झालेल्या सर्व 11 जणांनी झारखंड हायकोर्टात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. त्यानंतर हायकोर्टानं या आरोपींना जामीन दिला. त्यांना जामीन मिळाल्यामुळे स्थानिक भाजप आमदार शंकर चौधरी यांनी 8 दोषींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी जयंत सिन्हा यांना बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी 8 दोषींना पेढा भरुवून त्यांचा सत्कारही केला.

या सत्कार समारंभामुळे जयंत सिन्हा यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधी काँग्रेस पक्षानं भाजप हा गुन्हेगारांचा सत्कार करणारा पक्ष असल्याची टीका केली आहे. एवढच नाही तर जयंत सिन्हा यांचे वडील यशवंत सिन्हा यांनीही जयंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या मुलाच्या कृत्याचं मी कधीच समर्थन करु शकत नाही. ते मला अजिबात मान्य नाही. एवढच नाही तर माझा मुलगा नालायक निघाला या शब्दात यशवंत सिन्हा यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. ट्विटरवर त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS