मुंबई – नवाब मलिक आणि जयकुमार रावल यांच्यामधील वाद आता पेटला असून जयकुमार रावल यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचं माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. धुळे येथील ऊर्जा प्रकल्पात बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. मंगळवारी जयकुमार रावल यांनी मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान धर्मा पाटील यांची जमीन ज्या ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित झाली आहे, तिथे कवडीमोल किंमतीत जमीन घेऊन रावल यांनी कोट्यवधी रुपयांचा मोबदला घेतला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. परंतु नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप जयकुमार रावल यांनी फेटाळले असून त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.
COMMENTS