झारखंड विधानसभा निवडणूक निकाल, काँग्रेस, भाजपमध्ये काँटे की टक्कर!

झारखंड विधानसभा निवडणूक निकाल, काँग्रेस, भाजपमध्ये काँटे की टक्कर!

नवी दिल्ली –  झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
या मतमोजणीदरम्यान काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत आहे. झामुमो-काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 29 एजेएसयू 03, झाविमो 04 आणि
इतर 04 जागांवर आघाडीवर आहेत. या कलावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर असल्याचं दिसत आहे. 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान 5 टप्प्यांमध्ये मतदान झाले. आज पाच वाजेपर्यंत या निवडणुरीचा निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असून दुसऱ्यांदा सत्ता मिळते की काँग्रेस बाजी मारते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये सभा घेत जोरदार प्रचार केला होता. तर काँग्रेसनेही पुनरागमन करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. महाराष्ट्रात भाजपला फटका बसल्यानंतर झारखंडमध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS